रत्नागिरी- गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाची जिल्ह्यात पुन्हा रिमझिम सुरुवात झाली आहे. असा पाऊस सध्या शेतीला आवश्यक असल्याने या सरींच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.
रत्नागिरीत दडी मारलेल्या पावसाची पुन्हा रिमझिम सुरुवात, बळीराजा सुखावला - चिपळूण
यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले होते. त्यामुळे राजापूर, चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर शहरातही काही ठिकाणी नद्यांच्या पुराचे पाणी शिरले होते.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले होते. त्यामुळे राजापूर, चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर शहरातही काही ठिकाणी नद्यांच्या पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. दिवसभर अगदी ऊन पडत होते. अधूनमधून कधीतरी एखादी सर पडायची, पण बुधवारपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. विशेषतः चिपळूण, संगमेश्वर, खेड भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनदेखील अशीच स्थिती होती. एखादी सर अगदी 10 ते 15 मिनिटे चांगलीच बरसत होती, असा पाऊस सध्या शेतीला आवश्यक आहे.