रत्नागिरीतील हरचेरी बौध्दवाडीत जमीन खचली, घरानांही भेगा पडल्याने 9 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना - flood in ratnagiri
2019 मध्ये या परिसरातील ज्या ठिकाणी भेगा पडलेल्या होत्या. त्या ठिकाणी काही प्रमाणात यावर्षी पुन्हा जमीन खचली आहे. तसेच काही ठिकाणी भेगांचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. या धोकादायक ठिकाणी 9 कुटुंब आहेत. त्यांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हरचेरी बौध्दवाडीत जमीन खचली
रत्नागिरी-जिल्ह्यात सध्या पावसानं उसंत घेतली आहे. पण, जमीन खचण्याचे प्रकार मात्र सुरूच आहेत. रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी गावातील बौद्धवाडीमध्ये देखील जमिन खचली असून, जमिनीला तसेच घरांनाही भेगा पडल्या आहेत. त्यामुळे धोकादायक असलेल्या या भागातील 9 कुटुंबाना तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिल्या आहेत.