रत्नागिरी -सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. मात्र याप्रकरणी शिवसेनेकडून सावध प्रतिक्रिया येत आहेत. चिपळूण दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावर भाष्य करणं टाळलं. या प्रकरणाची माहिती घेऊन बोलतो, अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन, संजय राठोडबद्दल म्हणाले.. - पूजा चव्हाण
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. मात्र शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर मौन बाळगलं आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन नंतर बोलतो अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भाजपने या प्रकरणात संजय राठोड यांना लक्ष्य केलं आहे. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. दरम्यान याप्रकरणी शिवसेना युवाप्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी या प्रकरणात मौन बाळगलं आहे. याप्रकरणी चिपळूणमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या आदित्य ठाकरे यांना विचारलं असता, कोकणात एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आलोय, या प्रकरणात थोडी माहिती घेवून नंतर बोलीन, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी या विषयावर बोलणं टाळलं.