महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नोकर्‍या मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार झाले पाहिजेत - सुरेश प्रभू - माजी मंत्री सुरेश प्रभू मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारत या संकल्पने अंतर्गत नोकर्‍या मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार झाले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे.

मशीनचे वाटप करताना
मशीनचे वाटप करताना

By

Published : Dec 6, 2020, 7:51 PM IST

रत्नागिरी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक माणसाचा, घराचा, जिल्हा, राज्याचा विकास व्हायला हवा. शेतकरी, मच्छीमार, महिला, तरुण, लहान व्यापारी, मागासवर्गीय या सर्वांचा विकास हवा. नोकर्‍या मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार झाले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे.

नोकर्‍या मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार झाले पाहिजेत

एक हजार महिलांना शिलाई मशीन, एक हजार मुलींना सायकलचे वितरण

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जन शिक्षण संस्थान व पुणे विमान प्राधिकरणतर्फे जिल्ह्यातील एक हजार महिलांना शिलाई मशीन आणि सायकल बँक अंतर्गत 100 शाळांतील एकूण एक हजार मुलींना सायकलचे वितरण केले. त्यावेळी ते बोलत होते. टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात माजी मंत्री सुरेश प्रभू, उमा प्रभू यांनी दिल्लीतून वेबिनारद्वारे सहभाग घेतला. जन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद सावंत यांनीही ऑनलाइन कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहणार - उमा प्रभू

मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्ष उमा प्रभू म्हणाल्या की, शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत. जन शिक्षण संस्थान ही देशाील ग्रामीण भागात काम करणारी पहिली शिक्षण संस्था सिंधुदुर्ग येथे सुरेश प्रभू यांनी सुरू केली, असे यावेळी उमा प्रभू म्हणाल्या.

अनुभवसंपन्न सुरेश प्रभू यांचे खर्‍या अर्थाने कोकणाकडे लक्ष - अ‌ॅड. पटवर्धन

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली जन शिक्षण संस्थेने 25 वर्षांत कायापालट केला. आता रत्नागिरीतही लवकरच जन शिक्षण संस्थान सुरू होणार आहे. त्यातून जिल्ह्यात नक्कीच परिवर्तन सुरू होईल. कोकणात याद्वारे रचनात्मक काम उभे राहील. अनुभवसंपन्न सुरेश प्रभू यांचे खर्‍या अर्थाने कोकणाकडे लक्ष आहे. कोकण व येथील नागरिकांमध्ये परिवर्तन होण्यासाठी प्रभूंची तळमळ असते. अशा संस्थांमुळेच रत्नागिरी जिल्ह्याचा शाश्‍वत विकास होणार आहे, असे प्रतिपादन भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी यावेळी केले.

नवभारतासाठी सर्वांनी सज्ज व्हा - बाळ माने

माजी आमदार बाळ माने यांनी समारोपाच्या भाषणात सांगितले, 2021 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे नवभारतासाठी सर्वांनी सज्ज व्हा. परिवर्तन केंद्राची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी प्रत्येकाने योगदान द्या. यावेळी राजू सावंत, निशिकांत भोजने, नाबार्डच्या श्रद्धा हजीरनिज, बबनराव पटवर्धन, विजय केनवडेकर, रवींद्र वाडेकर व महेश गर्दे आदी उपस्थित होते. सुधीर पालव यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा -रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाजवळील अतिक्रण हटवणार, शंभर जणांना नोटीस

हेही वाचा -कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर चमकणाऱ्या लाटा!

ABOUT THE AUTHOR

...view details