महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगावर वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, नांदळज बौद्धवाडीतील घटना - नांदळज बौद्धवाडी बातमी

मंगळवारी संध्याकाळी देवरूख जवळच्या नांदळज बौद्धवाडीत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान सुशांत आपल्या घराच्या बाहेरील पडवीत बसला होता. त्याचवेळी वीजेचा लोळ त्याच्या अंगावर पडला, त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अंगावर वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

By

Published : Oct 9, 2019, 1:29 PM IST

रत्नागिरी - अंगावर वीज पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी देवरूख जवळच्या नांदळज बौद्धवाडी येथे घडली. सुशांत विश्वास कांबळे(१२) असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता सातवीमध्ये शिकत होता.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पावसाचे हजेरी लागत आहे. मंगळवारीही पावसाने जिल्ह्यात काहीशी अशीच सुरुवात केली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी विजांचा लखलखाट दिसत होता.

हेही वाचा - आमदार संजय कदम आणि सूर्यकांत दळवींना जनताच उत्तर देईल- योगेश कदम
मंगळवारी संध्याकाळी संगमेश्वर तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान संध्याकाळी नांदळज येथील सुशांत आपल्या घराच्या बाहेरील पडवीत बसला होता. त्याचवेळी वीजेचा लोळ त्याच्या अंगावर पडला. त्यानंतर नातेवाईकांनी सुशांतला तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात हलविलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात ३२ उमेदवार रिंगणात

ABOUT THE AUTHOR

...view details