रत्नागिरी -रत्नागिरीमध्ये जयगड समुद्रात ( Jaigad Sea )पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहू जहाज ( Singapore Oil tanker ship ) पालशेत समुद्रकिनारी अडकले आहे. समुद्रातील अजस्त्र लाटांच्या तडाख्याने ( Big Waves ) हे जहाज गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. भारतीय कोस्टगार्डकडून ( Indian Coast Guard ) देण्यात आलेल्या माहितीनुसार 17 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळील खोल समुद्रामध्ये हे जहाज पलटलेले ( Ship capsized ) होते.
Singapore oil tanker ship: जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहू जहाज पालशेत समुद्रकिनारी अडकले
रत्नागिरीमध्ये जयगड समुद्रात ( Jaigad Sea )पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहू जहाज ( Singapore Oil tanker ship ) पालशेत समुद्रकिनारी अडकले आहे. समुद्रातील अजस्त्र लाटांच्या तडाख्याने ( Big Waves ) हे जहाज गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
जयगड समुद्र
पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन -जहाजामधील तेल व जहाजामधील इतर वस्तू समुद्रामध्ये व समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनाऱ्यावर वाहून आलेल्या कोणत्याही वस्तूला हात न लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच काही संशयित वस्तू बाबत माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन गुहागर पोलीस, कस्टम व बंदर विभागातर्फे करण्यात आले आहे.