महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 19, 2021, 5:42 PM IST

ETV Bharat / state

अर्जुना नदीत एकजण गेला वाहून, शोधकार्य सुरू

राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीत एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. रायपाटण गांगणवाडी येथे ही दुर्घटना घडली आहे. विजय शंकर पाटणे (७० रा. खेड) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते रायपाटण गांगणवाडी येथे नातेवाईकांकडे आले होते, त्या दरम्यान ही घटना घडली आहे.

अर्जुना नदीत एकजण गेला वाहून, शोधकार्य सुरू
अर्जुना नदीत एकजण गेला वाहून, शोधकार्य सुरू

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीत एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. रायपाटण गांगणवाडी येथे ही दुर्घटना घडली आहे. विजय शंकर पाटणे (७० रा. खेड) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते रायपाटण गांगणवाडी येथे नातेवाईकांकडे आले होते, त्या दरम्यान ही घटना घडली आहे.

शोध सुरू

विजय पाटणे हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अर्जुना नदीकिनारी गेले होते. दरम्यान, अर्जुना नदीला मोठा पुर आलेला होता. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यावेळी पाटणे या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी समजली. त्यानंतर पाटणे यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आला पूर

राजापूर तालुक्यात पुन्हा सुरू झालेल्या संततधार पावसाने अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुर आला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. सोमवारी सकाळी पुराच्या पाण्याने जवाहर चौकातील ध्वजस्तंभाला वेढा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details