रत्नागिरी -जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे रत्नागिरीच्या विशेष कारागृहातील कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात रत्नागिरी विशेष कारागृहातील आठ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जेल प्रशासन हादरलं आहे.
रत्नागिरी कारागृहातील 8 कैद्यांना कोरोनाची लागण - Ratnagiri latest news
रत्नागिरीच्या विशेष कारागृहातील कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात रत्नागिरी विशेष कारागृहातील आठ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन हादरलं आहे.
रत्नागिरी
यापूर्वी विशेष कारागृहातील एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला होता. त्यामुळे जेल प्रशासनाने खबरदारी म्हणून कैदी आणि संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले होते. ते अहवाल बुधवारी रात्री आले, त्यामध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारी तसेच 8 कैद्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जेल कारागृहातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 वर पोहचली आहे
दरम्यान जिल्ह्यात मंगळवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन करण्यात आला आहे.