रत्नागिरी - जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे. यामुळे चिपळूण शहराला पावसाच्या पाण्याने वेढले होते. चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चिपळूण नगरपालिकेच्या समोर हे अपरांत हॉस्पिटल आहे. दरम्यान या रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला नसल्याची माहिती शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे.
Chiplun Flood Impact: चिपळूणच्या अपरांत रुग्णालयामधील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू - चिपळूणमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू
मागील दोन दिवसांपासून चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला होता. हे पुराचे पाणी येथील अपरांत रुग्णालयामध्ये सुद्धा शिरले होते. याठिकाणी 21 रुग्ण हे उपचारासाठी ठेवण्यात आले होते. यातील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
मागील दोन दिवसांपासून चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला होता. हे पुराचे पाणी येथील अपरांत रुग्णालयामध्ये सुद्धा शिरले होते. याठिकाणी 21 रुग्ण हे उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यातील काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. मात्र पुराचे पाणी रुग्णालयामध्ये शिरल्याने येथील सर्व संपर्क तुटला होता. जसजसे पाणी ओसरत आहे, तसतसे तिथली परिस्थिती पुढे येत आहे. या रुग्णालयातील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दरम्यान या रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला नसल्याची माहिती शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - रायगड दरड दुर्घटना अपडेट : आतापर्यंत 44 मृतदेह आढळले; अद्याप 41 जणांचा शोध सुरुच