रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे बुधवारी (22जुलै) जमावाने आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर हल्ला केला होता. तसेच याठिकाणी धक्काबुक्की देखील झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोषींवर गुन्हे दाखल करत 7 जणांना अटक केली आहे.
रत्नागिरी कोविड योद्धा हल्ला प्रकरण : 250 जणांवर गुन्हा दाखल, 7 जणांना अटक - covid warrior in ratnagiri
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे बुधवारी (22जुलै) जमावाने आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर हल्ला केला होता. तसेच याठिकाणी धक्काबुक्की देखील झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोषींवर गुन्हे दाखल करत 7 जणांना अटक केली आहे.
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आणण्यासाठी गेलेल्या कोरोना योद्ध्यांवर जमावाने हल्ला केला होता. यामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाले.
दरम्यान, या प्रकरणात आता 250 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर यावेळी जमावाला हिंसक होण्यास प्रवृत्त करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली. सध्या या गावातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे ते म्हणाले.