महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूणला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, 63 घरांचे नुकसान - चिपळूणला वादळाचा फटका

कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा चिपळूणलाही जोरदार तडाका बसला असून, तब्बल 63 घरांचे नुकसान झाले आहे.

63 houses damaged due to Nisarg cyclone in chiplun
चिपळूणला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, 63 घरांचे नुकसान

By

Published : Jun 5, 2020, 5:55 PM IST

रत्नागिरी -कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार 3 जूनला कोकण किनारपट्टीवर पहाटेपासून वादळ, पाऊस प्रचंड वेगाने सुरू झाला. ताशी वेग 90 किमीपेक्षा जास्त होता. या निसर्ग चक्रीवादळात अनेक नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागला.

चिपळूणला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, 63 घरांचे नुकसान


निसर्ग चक्रीवदळाचा चिपळूणलाही जोरदार तडाका बसला असून, तब्बल 63 घरांचे नुकसान झाले आहे. काही दुकानांचे तसेच हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. झाडे रस्त्यावर कोलमडून पडल्याने काही भागातील रस्ते बंद पडले होते. शहरी भागामध्ये इमारतीचे पत्रे उडण्याचे प्रकार घडले, तसेच ग्रामीण भागामध्ये अनेक घराची पडझड झाली आहे. गुरांच्या गोट्यांवर झाडे कोसळली आहेत. तसेच या वादळामध्ये नागरिकांना दुखापत झाली आहे.

चिपळूणला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, 63 घरांचे नुकसान
चिपळूणला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, 63 घरांचे नुकसान

वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे प्रशासनाने पूर्वतयारी केली होती. संचारबंदीत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. पहाटेपासून वारा आणि पाऊस सुरू झाल्याने, सकाळी 7 वाजल्यापासून वाऱ्याचा वेग प्रचंड वाढायला लागला होता. वादळी वाऱ्यासहीत पाऊस कोसळू लागला. अनेक ठिकाणी वृक्ष व फांद्या कोसळून घरांचे नुकसान झाले.

चिपळूणला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, 63 घरांचे नुकसान

खेर्डी दातेवाढी येथे दोन घरांवर झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पागमळा येथील देसाई बाजार येथे वृक्ष कोसळल्याची घटना घडली. मार्कंडी, कविळतळी, पागझरी, गोवळकोट रोड, पेठमाप या भागात वृक्ष कोसळल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहेत. तसेच काही वाहनाचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील अनेक ठिकाणी नुकसान झाले असून, स्थानिक प्रशासन याची पाहणी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details