रत्नागिरी -जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे 29 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 844 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात 622 नव्या कोरोनाबाधितांची देखील नोंद झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची देखील संख्या वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यात कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.02 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.
जिल्ह्यात 622 कोरोनाबाधितांची नोंद
जिल्ह्यात मंगळवारी 622 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 196 रुग्ण आरटीपीसीआर तर 306 रुग्ण हे अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 27 हजार 893 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सापडलेल्या 622 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 362, दापोली 12 , खेड 14 , गुहागर 27 , चिपळूण 89, संगमेश्वर 46 , राजापूर 16 आणि लांजा तालुक्यात 56 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होणाऱ्यांचे प्रमाण 16.73 टक्के एवढे आहे.
हेही वाचा -भीमा कोरेगाव प्रकरण : सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज