महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत 615 कोरोनाबाधितांची नोंद, 20 रुग्णांचा मृत्यू - नव्या कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सध्या सुरुच आहे. गेल्या 24 तासात 615 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 20 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा कहर
कोरोनाचा कहर

By

Published : Apr 26, 2021, 12:44 AM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात कोरोनाचा कहर सध्या सुरुच आहे. गेल्या 24 तासात 615 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 20 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांतील 4 मृत्यूही जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण 24 मृत्यू जिल्हा प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहेत.

दिवसभरात 615 पॉझिटिव्ह रुग्ण
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान रविवारी दिवसभरात 615 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 615 पैकी 239 रुग्णांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. तर 376 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 615 नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 19 हजार 224 झाली आहे.

24 तासात 20 जणांचा मृत्यू
कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासात तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरी 3, संगमेश्वर 3, चिपळूण 4, राजापूर 4, लांजा 2, दापोलीतील 4 जणांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत आणखी 4 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पडलेल्यांची संख्या आता 576 वर जाऊन पोहोचली आहे. दररोज वाढत जाणारी रुग्णसंख्या, त्यात वाढत जाणाऱ्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

हेही वाचा -राज्यात 66 हजार 191 नव्या रुग्णांची वाढ, 61 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त

ABOUT THE AUTHOR

...view details