महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एप्रिलमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; 6 हजार 22 रूग्ण तर, 112 जणांचा मृत्यू - रत्नागिरी कोरोना उद्रेक बातमी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभाग रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढतच आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या 21 दिवसांमध्ये 6 हजार 22 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

Ratnagiri Government Hospital
Ratnagiri Government Hospital

By

Published : Apr 23, 2021, 5:48 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या कोरोना रुग्णांचा दररोज एक नवा उच्चांक जिल्ह्यात पहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यातील 21 दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

रूग्णसंख्येचा उच्चांक -

रत्नागिरी जिल्ह्यात कधी नव्हे एवढे कोरोनाचे रुग्ण एकट्या एप्रिल महिन्यात सापडले आहेत. तर, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही या महिन्यात वाढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील 21 दिवसात तब्बल 6 हजार 22 कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 हजार 51 वर पोहचली आहे. मार्च अखेर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 हजार 29 एवढी होती. त्यात आता 6 हजार 22 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सुरुवातीला 100 च्या पटीत सापडणाऱ्या रुग्णांची संख्या नंतर मात्र 200, 300, 400, 500 आणि 600 च्या पटीत वाढू लागली आहे. 22 एप्रिलला जिल्ह्यात 685 नविन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एका दिवसात एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 21 एप्रिल अखेर तब्बल 112 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मार्च अखेर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 376 एवढी हाती. त्यात 112 जणांची भर पडल्याने ही संख्या 488 वर जाऊन पोहचली आहे.

मृत्यूचे प्रमाण का वाढले?

अनेकजण लक्षणे असली तरी तरीही आपण पॉझिटिव्ह होऊ, या भीतीने चाचणी करण्यास जात नाहीत. त्यामुळे वेळेत निदान न झाल्याने उपचारही वेळेवर होत नाहीत. परिणामी मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. रत्नागिरी आणि चिपळूण या दोन तालुक्यांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी तालुक्यात आतापर्यंत 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, चिपळूण तालुक्यात 107 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंडणगड तालुक्यात सर्वांत कमी मृत्यूदर आहे. मृतां वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाकडून वेळेवर उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन केले जात आहे.

एप्रिल महिन्यातील जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती -

(दिवस-पॉझिटिव्ह रुग्ण-मृत्यू)

1 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 78, मृत्यू - 1
2 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 155, मृत्यू - 0
3 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 116, मृत्यू - 1
4 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 60, मृत्यू - 0
5 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 132, मृत्यू - 2
6 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 138, मृत्यू - 2
7 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 172, मृत्यू - 4
8 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 140, मृत्यू - 2
9 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 251, मृत्यू - 1
10 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 248, मृत्यू - 2
11 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 214, मृत्यू - 7
12 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 227, मृत्यू - 5
13 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 337, मृत्यू - 5
14 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 324, मृत्यू - 7
15 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 417, मृत्यू - 6
16 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 522, मृत्यू - 8
17 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 515, मृत्यू - 10
18 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 555, मृत्यू - 10
19 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 259, मृत्यू - 15
20 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 685, मृत्यू - 11
21 एप्रिल - पॉझिटिव्ह रुग्ण - 477, मृत्यू - 13

ABOUT THE AUTHOR

...view details