रत्नागिरी -जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. आज आलेल्या अहवालानुसार मागील 24 तासात जिल्ह्यात 596 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज 596 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 24 हजार 222 इतकी झाली आहे. तर आज तब्बल 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आज 596 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
गेले काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज नव्याने आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 596 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज आलेल्या अहवालानुसार 277 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 396 रुग्ण अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 84, दापोली 45, खेड 68, गुहागर 48, चिपळूण 246, संगमेश्वर 38, मंडणगड 16, राजापूर 25 आणि लांजा तालुक्यात 26 रुग्णांचा समावेश आहे.
17 जणांचा मृत्यू
तर मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 715 इतकी झाली आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.95 % आहे. आज जिल्ह्यात 521 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 16 हजार 912 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना रिकव्हरी रेट 69.82 टक्के आहे.
रत्नागिरी : आज 596 नव्या कोरोना रुग्णांची भर, 17 जणांचा मृत्यू
आज 596 नवे रुग्ण सापडल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 24 हजार 222 इतकी झाली आहे. तर आज तब्बल 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
रत्नागिरी : आज 596 नव्या कोरोना रुग्णांची भर, 17 जणांचा मृत्यू