रत्नागिरी - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाचशेवर कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मागील 24 तासांत सापडले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 555 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 555 पैकी 348 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले, तर 207 रुग्ण अँटिजेन चाचणी केलेले आहेत. 555 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 630 झाली आहे. तर, आज 10 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -चिपळूण; खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये आग; लाखोंचे नुकसान
कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट
जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. गेले तीन दिवस तर 500 हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. दरम्यान गेल्या 24 तासांत आणखी 555 रुग्णांची भर पडली आहे. आज सापडलेल्या 555 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 160, दापोली 26, खेड 72, गुहागर 52, चिपळूण 131, संगमेश्वर 61, मंडणगड 9, राजापूर 20 आणि लांजा तालुक्यात 24 रुग्ण सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता आणखी वाढली आहे.
आज आणखी 10 जणांचा मृत्यू
दरम्यान मागील चोवीस तासांत जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 449 इतकी झाली आहे. आज मृत्यू झालेल्या 10 मध्ये रत्नागिरी तालुक्यातील 1, चिपळूणमधील 2, राजापूरमधील 1, दापोलीतील 2, संगमेश्वरमधील 3, खेडमधील 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.87 टक्के आहे, तर जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 76.19 टक्के आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 12.05 टक्के आहे.
हेही वाचा -मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार