रत्नागिरी -जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. काल गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 520 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर, जिल्ह्यात काल 5 मृत्यूंची नोंद झाली.
हेही वाचा -राजापूरमधील उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन
आज 520 पॉझिटिव्ह रुग्ण
मागील काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज पाचशेपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित होत आहेत. काल आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 520 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 22 हजार 803 वर जाऊन पोहचली आहे. काल आलेल्या अहवालात 303 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत, तर 217 रुग्ण अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यात सापडलेल्या 520 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 140, दापोली 67, खेड 73, गुहागर 34, चिपळूण 96, संगमेश्वर 61, मंडणगड 11, राजापूर 7 आणि लांजा तालुक्यात 31 रुग्ण सापडले आहेत.
5 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात काल 5 मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 661 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 2.89 टक्के आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 15.00 टक्के आहे.
हेही वाचा -रत्नागिरीत महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण