रत्नागिरी- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी आर्थिक मदत करा, असे आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारनेही केले आहे. त्यानंतर अनेक उद्योजन, कलाकार, व्यापारी, कंपन्या, संस्था, देवस्थाने तसेच दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थाननेदेखील आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थानने ५० लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्य निधीला दिला आहे.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचीही ५० लाखांची मदत... हेही वाचा-धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राजन बोडेकर, रत्नागिरी पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी पुरुषोत्तम सुर्वे यांच्याकडून धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते. संस्थानच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्वागत केले आहे. जिल्हाधिकारी मिश्रा यांनीही संस्थानचे आभार मानले आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.