रत्नागिरी - विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यासोबत कोकणातील ५ ते ६ आमदारही भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे लाड यांनी सष्ट केले आहे.
कोकणातील ५ ते ६ आमदार भाजपात येण्यास उत्सुक - प्रसाद लाड - कोकण
कोकणातील ५ ते ६ आमदारही भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सष्ट केले आहे.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड
पक्षात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री घेणार आहेत. मात्र, लवकरच भाजपमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. तसेच विधानसभेसाठी सेना आणि भाजपमधील युती कायमच राहणार असल्याचा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
Last Updated : Aug 18, 2019, 11:42 AM IST