रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 402 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नवे 402 रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 32 हजार 846 झाली आहे. 24 तासात जिल्ह्यात 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 618 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात 402 नवे रुग्ण
रत्नागिरीत 24 तासात 402 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद - कोरोना अहवाल
जिल्ह्यात बुधवारी 343 , गुरुवारी 339 , शुक्रवारी 450 तर शनिवारी 372 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. तर रविवारी जिल्ह्यात 402 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 189 रुग्ण आरटीपीसीआर तर 213 रुग्ण अँटिजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 32 हजार 846 वर जाऊन पोहचली आहे.
जिल्ह्यात बुधवारी 343 , गुरुवारी 339 , शुक्रवारी 450 तर शनिवारी 372 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. तर रविवारी जिल्ह्यात 402 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 189 रुग्ण आरटीपीसीआर तर 213 रुग्ण अँटिजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 32 हजार 846 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण 17.27 % आहे. जिल्ह्यात 618 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 28179 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासात 1555 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 556 जणांपैकी 367 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1401 पैकी 1188 निगेटिव्ह आले आहेत. 24 तासात जिल्ह्यात 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृत्यूसंख्या 1076 झाली आहे.