रत्नागिरी-जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रात्रीपासून जिल्ह्यात तब्बल 40 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 750 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात दररोज वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्याच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या 40 नव्या रुग्णांची वाढ; एकूण आकडा 750 वर - कोरोना अपडेत रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 484 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्याची चिंता वाढवणारी आहे.
रविवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात 40 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांपैकी जिल्हा कोव्हिड रुग्णालय येथे 8 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे 14 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय कळबणी येथे 15 रुग्ण, तर राजापूर रुग्णालय 2 रुग्ण, आणि दापोलीत एका रुग्णाला दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 484 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्याची चिंता वाढवणारी आहे.