रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी 4 नवे रुग्ण... एकूण रुग्णांची संख्या 449 वर
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 872 जणांचे सॅब नमूने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 537 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 449 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 7 हजार 68 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
रत्नागिरी- जिल्ह्यात बुधवारी आणखी 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 449 वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात 9 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत 17 मृत्यू झाले आहेत. तर एकूण 334 जण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे आता ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 98 इतकी आहे.
आत्तापर्यंत 7 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 872 जणांचे सॅब नमूने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 537 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 449 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 7 हजार 68 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 335 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 335 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 216 अहवाल मिरज आणि 115 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
30 कन्टेंनमेन्ट झोन...
जिल्ह्यात सध्या 30 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 3 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, खेड तालुक्यात 04 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 02, दापोली मध्ये 05 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 01, चिपळूण तालुक्यात 06 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 06 आणि मंडणगड मधील 02 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.