महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात नवे 392 कोरोना रुग्ण; तर 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद - रत्नागिरी कोरोना मृत्यू 26 एप्रिल 2021

आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडत होते. सोमवारी मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र आहे. 24 तासात 392 रुग्णांची भर पडली.

Ratnagiri corona update
रत्नागिरी कोरोना अपडेट

By

Published : Apr 27, 2021, 8:41 AM IST

रत्नागिरी -मागील 24 तासात जिल्ह्यात 392 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यातील 254 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 138 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 392 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 19 हजार 616 झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

24 तासात 392 रुग्णांची भर -

आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडत होते. सोमवारी मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र आहे. 24 तासात 392 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 19 हजार 616 जाऊन पोहचली आहे. सोमवारी आलेल्या अहवालात 254 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 138 रुग्ण अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.

जिल्ह्यातील सोमवारी सापडलेल्या 392 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 138, दापोली 77, खेड 19 , गुहागर 10 , चिपळूण 97 , संगमेश्वर 29 , राजापूर 13 आणि लांजा तालुक्यात 9 रुग्ण सापडले आहेत. तर सोमवारी 1094 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,22,272 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 18 रुग्णांचा बळी गेला असून, जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 594 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.02 % आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details