रत्नागिरी-जिल्ह्यात आणखी 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्येने 150 चा टप्पा पार केला असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 156 झाली आहे.
काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 156 झाली आहे.
गेल्या काही तासांत पॉझिटिव्ह आलेल्या 11 अहवालांमध्ये खेड तालुक्यातील ताले या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे. हे सर्व मुंबई येथून दाखल झाले होते. त्यांना ताप असल्याने क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले होते. अन्य एक जण ठाणे येथून आलेला असून त्या युवकाचे गाव वरावली हे आहे, तर मुलुंड येथून आलेल्या एक रुग्ण खेड तालुक्यातील दयाल गावातील आहे.
कोरोनाबाधितांमध्ये वनझोळी या गावातील दोन रुग्ण आहेत, तर एक रुग्ण ताडेजंभारी तालुका गुहागर येथील आहे. एक रुग्ण पांगरी देवरूख येथील असून अन्य एक रुग्ण लाजुळ-तालुका लांजा येथील आहे. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 156 इतकी झाली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसात कोरोनाबधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून बाधित रुग्ण हे मुंबईकर असल्याचे निष्पन्न झाले आहे.