रत्नागिरी - कोकणात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या ताडाख्यातून बीएसएनएल अर्थात भारतीय संचार निगम लिमिटेड सुद्धा सुटलेली नाही. बीएसएनएलचे मोठे नुकसान झाल्याचे आता समोर आले आहे. सध्या बीएसएनएलची दापोलीतील 16 तर, मंडणगडमधील 8 सब-स्टेशन्स बंद आहेत. त्यामुळे या भागातील बीएसएनएलचे जवळपास 23 हजार ग्राहक सध्या नाॅट-रिचेबल आहेत.
वादळानंतर रत्नागिरीतले 23 हजार ग्राहक 'नॉट रिचेबल'; बीएसएनएलचे टॉवर जमीनदोस्त झाल्याने सेवेत खंड - BSNL in ratnagiri
कोकणात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या ताडाख्यातून बीएसएनएल अर्थात भारतीय संचार निगम लिमिटेड सुद्धा सुटलेली नाही. बीएसएनएलचे मोठे नुकसान झाल्याचे आता समोर आले आहे. सध्या बीएसएनएलची दापोलीतील 16 तर, मंडणगडमधील 8 सब-स्टेशन्स बंद आहेत. त्यामुळे या भागातील बीएसएनएलचे जवळपास 23 हजार ग्राहक सध्या नाॅट रिचेबल आहेत.
![वादळानंतर रत्नागिरीतले 23 हजार ग्राहक 'नॉट रिचेबल'; बीएसएनएलचे टॉवर जमीनदोस्त झाल्याने सेवेत खंड ratnagiti BSNL](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7738473-776-7738473-1592913716979.jpg)
निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली, मंडणगड तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे पडली, नारळी-पोफळी, आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. याचा तडाखा 'बीएसएनएल'ला बसला. दापोली, मंडणगडमधील बीएसएनएलचे 40 मीटरचे दोन महत्त्वाचे टाॅवर्स बंद पडले आहेत. याव्यतिरिक्त जवळपास 35 टाॅवर्स सध्या बंद अवस्थेत आहेत. यातील काही टाॅवर्स जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे बीएसएनएलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुळात या सर्व टाॅवर्सना लागणारा विद्युत पुरवठा अद्याप सुरळीत सुरू झालेला नाही. त्यामुळे बीएसएनएल समोरच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. बीएसएनएलच्या सबस्टेशनची छपरं कोसळली आहेत. यामुळे बीएसएनएलची सेवा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सामग्रीचा पुरवठा झालेला नाही. त्यातच आता संपूर्ण यंत्रणा नव्याने उभारावी लागणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून काही दिवस दापोली आणि मंडणगडमधील बीएसएनएलचे ग्राहक 'नाॅट रिचेबल' राहण्याची शक्यता आहे.