महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cannonballs on Palgad Fort : शिवकालीन पालगड किल्ल्यावर सापडले 22 तोफगोळे - Shivjayanti 2022

दापोली तालुक्यातील पालगड आणि खेड तालुक्यातील घेरा पालगड या दोन गावाच्या मध्यभागी शिवकालीन पालगड किल्ला (Palgad Fort) आहे. झेंडा लावण्यासाठी खड्डा खोदत असताना एका जागेवर एकूण 22 तोफगोळे ( Cannonballs on Palgad Fort ) झोलाई स्पोर्ट्सचे सभासद अक्षय दाभेकर यांना दिसून आले.

Cannonballs
Cannonballs

By

Published : Feb 23, 2022, 4:04 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील शिवकालीन पालगड किल्ल्यावर 22 तोफगोळे ( Cannonballs on Palgad Fort ) सापडले आहेत. शिवजयंतीच्या पुर्व संध्येला शिवजयंती तयारीच्या कामासाठी गेलेल्या तरूणांना हे तोफगोळे सापडले आहेत.

पालगड किल्ल्यावर सापडले 22 तोफगोळे
दापोली तालुक्यातील पालगड आणि खेड तालुक्यातील घेरा पालगड या दोन गावाच्या मध्यभागी शिवकालीन पालगड किल्ला आहे. झोलाई स्पोर्ट्स पालगड यांच्या कडून दरवर्षी पालगड किल्ला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी शिवजयंतीची तयारी चालू असताना झेंडा लावण्यासाठी खड्डा खोदताना एका जागेवर एकूण 22 तोफगोळे झोलाई स्पोर्ट्सचे सभासद अक्षय दाभेकर यांना दिसून आले. त्या नंतर हे सर्व तोफगोळे बाहेर कडून शिवजयंतीच्या दिवशी किल्ले पालगड येथे पूजनास ठेवण्यात आले होते आणि हे तोफगोळे पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. झोलाई स्पोर्ट्स पालगड यांजकडून किल्ले साफ सफाई करत असताना मागच्या वर्षी एक मोठा तोफगोळा देखील मिळाला होता. तसेच झोलाई स्पोर्ट्स पालगड यांच्याकडून यावर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details