महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corporators Support Uday Samant : रत्नागिरी नगर परिषदेतील 20 माजी नगरसेवकांचा आमदार उदय सामंत यांना पाठींबा - Our support is yours

गेल्या काही दिवसांपासुन राज्यात सातत्याने सत्ता पक्षांतर सुरु आहे. यामध्ये आधी शिवसेना गटातील आमदार व खासदार यांचा समावेश होता. त्यानंतर जिल्हा, तालुका पातळीवरील राज्यकर्ते यांचा समावेश होता. आणि आता शिवसेना पक्षातील नगरसेवक देखील, शिवसेना सोडुन मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी होऊ लागले आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील (Ratnagiri Municipal Council) 20 माजी नगरसेवकांनी 'आमचा पाठिंबा तुम्हालाच' (corporators support uday samant ) असा विश्वास देत,आमदार उदय सामंत (Uday Samant) यांना आश्वस्थ केले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

Uday Samant
आमदार उदय सामंत

By

Published : Jul 26, 2022, 7:41 PM IST

रत्नागिरी :'आमचा पाठिंबा तुम्हालाच' (corporators support uday samant ) असा विश्वास देत रत्नागिरी नगर परिषदेतील (Ratnagiri Municipal Council) 20 माजी नगरसेवकांनी, आमदार उदय सामंत (Uday Samant) यांना आश्वस्थ केले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रीया देतांना उद्य सामंत यांच्यासह अन्य नगरसेवक

रत्नागिरी नगरपरिषदेतील नगरसेवक नेमके कुणाच्या बाजूने असे तर्कवितर्क गेले काही दिवस लढवले जात होते.याला कारण म्हणजे याच नगरसेवकांबद्दल केले जाणारे दावे हे होय. शिवसेनेचे नेते रत्नागिरी दौऱ्यावर दोन दिवसांपुर्वी आले होते. त्यावेळी शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी, रत्नागिरी नगरपरिषदेतील 9 नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान सोमवारी सायंकाळी आमदार उदय सामंत यांची 20 नगरसेवकांनी शासकीय विश्रामगृह माळनाका येथे भेट घेतली. त्यांनी आमचा पाठिंबा शिवसेनेत राहून उदय सामंत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचा दावा केला आहे.


यावेळी स्मितल पावसकर , मुसा काझी , निमेश नायर , राजन शेटये , कौशल्या शेटये , रोशन फाळके , दिशा साळवी, राजेश्वरी शेट्ये , श्रद्धा हळदणकर , विकास पाटील , सुहेल साखरकर , सुहेल मुकादम , वसंत पाटील, वैभवी खेडेकर , बावा नागवेकर , बंटी कीर , उज्ज्वला शेट्ये आदी नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा :Shinde Govt : ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती देत शिंदे सरकारचा नव्या जीआरचा धडाका, काढले 538 जीआर

ABOUT THE AUTHOR

...view details