महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत मार्बल अंगावर पडून 2 हमालांचा मृत्यू, 2 गंभीर - Ratnagiri Crime news

उद्यमनगर येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या महिला रुग्णालयाच्या साईटवरील मार्बलच्या लाद्या दुसऱ्या साईटवर घेऊन जाण्यासाठी टेम्पो भरत असताना एका बाजूने मार्बल हमालांच्या अंगावर पडून ही घटना घडली.

Ratnagiri
रत्नागिरीत मार्बल अंगावर पडून 2 हमालांचा मृत्यू

By

Published : Dec 11, 2019, 1:10 AM IST

रत्नागिरी- मार्बलच्या लाद्या (फरशा) हमालांच्या अंगावर पडून 2 हमालांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर 2 हमाल गंभीर जखमी झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उद्यमनगर येथे मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा - MS-CIT आता 2 प्रकारात; MKCL च्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती

उद्यमनगर येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या महिला रुग्णालयाच्या साईटवरील मार्बलच्या लाद्या दुसऱ्या साईटवर घेऊन जाण्यासाठी टेम्पो भरत असताना एका बाजूने मार्बल हमालांच्या अंगावर पडून ही घटना घडली. यामध्ये सुरज सुधाकर सोलकर (वय २१ रा. केळ्ये) व अन्य 1 अशा दोघांचा मृत्यू आहे. तर संतोष कांबळे, सुभाषचंद्र नाईक हे दोघे जखमी झाले आहेत. या दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, खासदार विनायक राऊत यांची राणेंवर टीका

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून केळ्ये गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यासह दोघा मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची आक्रमक भूमिका केळ्येवासियांनी घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details