रत्नागिरी - आंघोळीसाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथील झावरी नदीच्या पात्रात रुमानी बंदराजवळ ही घटना घडली. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. उमेर यासीन मुकादम (वय-१७) आणि दाऊद अब्दुल साबळे (वय १५) दोघेही वाघिवरे मोहल्ला राहत होते.
दोन शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू; चिपळूण तालुक्यातल्या वाघिवरे येथील घटना - शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथील झावरी नदीच्या पात्रात रुमानी बंदराजवळ आंघोळीसाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

2 शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू चिपळूण तालुक्यातल्या वाघिवरे येथील घटना
दोन शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू; चिपळूण तालुक्यातल्या वाघिवरे येथील घटना
दोघे जण नदीवर अंघोळीसाठी गेले होते. अशातच पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही बुडाले. सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा दोघेही मृत झाले होते. या घटनेबाबत वाघिवरेचे पोलीस पाटील अनिल अनंत जाधव यांनी पोलीस स्थानकात खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक लालजी यादव हे करीत आहेत.
Last Updated : Apr 21, 2020, 7:08 PM IST