महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपळीच्या कॅनालमध्ये तिघे बुडाले; दोघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू - ratnagiri 3 drawn

पिंपळी बुद्रुक येथील काही तरुण मुले शुक्रवारी संध्याकाळी कॅनॉलमध्ये पोहोयला गेली असताना पाण्याच्या मोठ्या प्रवाहात तिघे बुडाले. यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे. तर, एक जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहात गेला. त्याचा तपास अद्याप सुरू आहे.

पिंपळीच्या कॅनालमध्ये तिघे बुडाले; दोघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू
पिंपळीच्या कॅनालमध्ये तिघे बुडाले; दोघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

By

Published : May 9, 2020, 2:40 PM IST

रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील पिंंपळी येथील कॅनालमध्ये तीन युवक बुडाले. यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे. तर, एक जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहात गेला. त्याचा शोध अद्याप सुरू आहे. हे सर्व जण पिंपळी बुद्रुक येथील आहेत. या घटनेविषयी पिंपळी सरपंचांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात कळवले आहे.

पिंपळी बुद्रुक येथील काही तरुण मुले शुक्रवारी संध्याकाळी कॅनॉलमध्ये पोहोयला गेली होती. जवळपास 20 ते 22 वयाच्या या तरुणांनी पोहण्याचा आनंद लुटला. काही जण पोहून कॅनॉलबाहेर पडले. इतक्यात पाण्याचा एक मोठा प्रवाह आला आणि प्रवीण प्रकाश सावंत, पारस अनिल सावंत आणि दीपक तुलसीराम मोहिते हे तिघे बुडू लागले. यामुळे एकच आरडा ओरडा सुरू झाला. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ते पाण्यात हात पाय हलवू लागले. पारस याने झाडाची वेल पकडली. तर, दीपक याने कनॉलचा कठडा पकडला. काठावरच्या बाकीच्या मुलांनी त्यांना हात देऊन पाण्याचा बाहेर काढले. त्यामुळे दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने पाण्याचा मोठ्या प्रवाहात प्रवीण हा वाहत गेला आणि बुडाला. त्याचा शोध अद्याप सुरू आहे.

या घटनेविषयी शिरगाव पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, एच. सी. सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details