रत्नागिरी - आज दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या 11 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 195 झाली आहे. दरम्यान काल सायंकाळपासून आजपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 3 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 39 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 367 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आज दिवसभरात 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय 1, संगमेश्वर 4, कोविड केअर सेंटर - सामाजिक न्याय भवन 3, कोविड केअर सेंटर - खेड 3 येथील रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 158 अॅक्टीव रूग्ण आहेत तर 14 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात 66 अॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन -
जिल्ह्यात सध्या 66 अॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 9 गावांमध्ये, गुहागर तालुक्यात 5 गावांमध्ये, खेड तालुक्यात 6 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 7 गावांमध्ये, दापोली तालुक्यात 9 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 14 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 10 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
आत्तापर्यंत 6 हजारांहून अधिक अहवाल निगेटिव्ह -
जिल्हा रुग्णालयामार्फत आत्तापर्यंत एकूण 6 हजार 958 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 6 हजार 593 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 367 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 6 हजार 201 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 365 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 365 प्रलंबित अहवालमधील 4 अहवाल कोल्हापूर येथे तर 361 अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये आहेत.