महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवरे दुर्घटना: १९ मृतदेह सापडले, १८ जणांची ओळख पटली

१९ जणांचे मृतदेह आत्तापर्यंत हाती आले आहेत. यापैकी १८ जणांची ओळख पटली आहे. तर एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

तिवरे दुर्घटना

By

Published : Jul 5, 2019, 12:34 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यातील चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले होते. यापैकी १९ जणांचे मृतदेह आत्तापर्यंत हाती आले आहेत. यापैकी १८ जणांची ओळख पटली आहे. तर एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) शोधमोहीम सुरूच आहे.

एनडीआरएफचे जवान, स्थानिक नागरिक तसेच काही स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. अजूनही ४ व्यक्ती बेपत्ता आहेत. शेवटचा मृतदेह सापडेपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तिवरे धरणाचे बांधकाम २००४ साली पूर्ण झाले होते. त्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यात धरण खचल्याचे पत्र मिळाले होते. त्यानंतर माती आणून त्याठिकाणी उतारात पडलेला खड्डा बुजवण्यात आला होता. गेल्या १ तारखेला धरण फक्त २५ ते ३० टक्केच भरले होते. मात्र, २ तारखेला कोयना परिसरातील नौजा येथे १९० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे पाण्याची पातळी अचानक ९ मीटरने वाढली. त्यामुळे सांडवा भरून वाहू लागला. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ओली माती वाहून गेल्याने धरण फुटले.

ABOUT THE AUTHOR

...view details