महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना : आणखी 4 मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 17 वर - चिपळूण

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.

तिवरे धरण दुर्घटना : आणखी 4 मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 17 वर

By

Published : Jul 4, 2019, 6:42 PM IST

Updated : Jul 4, 2019, 7:29 PM IST

रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. बेपत्ता असलेल्यांपैकी गुरुवारी दुपारपर्यंत 17 जणांचे मृतदेह सापडले होते. बुधवारी रात्रीपर्यंत 13 तर गुरुवारी 4 मृतदेह सापडले होते. आज (गुरुवारी) आणखी 4 मृतदेह सापडले आहेत. यामध्ये एका पती-पत्नीचा समावेश आहे. या दोघांवर आज एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिवरे धरण दुर्घटना : आणखी 4 मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 17 वर

दरम्यान, 13 जणांवर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. 8 जणांवर चिपळूण येथील स्मशानभूमीत तर चौघांवर खेर्डी आणि एकावर पोफळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज दुपारी रणजित चव्हाण आणि ऋतुजा चव्हाण या पती-पत्नीवर चिपळूणमधील रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रणजीत यांचे भाऊ अजित अनंत चव्हाण यांनी त्यांना मुखाग्नी दिला. अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Last Updated : Jul 4, 2019, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details