महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा; कार्यकारिणीमध्ये 16 उपाध्यक्षांची निवड

कार्यकारिणीमध्ये १६ उपाध्यक्ष, 1 कोषाध्यक्ष, १७ सरचिटणीस, २० चिटणीस, १३ सल्लागार, ६ सदस्य त्याचबरोबर १२ कायम निमंत्रीत यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

ratnagiri
पत्रकार परिषदेचे दृश्य

By

Published : Dec 29, 2019, 4:39 AM IST

रत्नागिरी- जिल्हा काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी जिल्हा प्रवक्ते अशोकराव जाधव, दीपक राऊत, बंडू सावंत, कपिल नागवेकर आदी उपस्थित होते.

माहिती देताना काँग्रेसचे जिल्हाध्यतक्ष ऍड.विजय भोसले

कार्यकारिणीमध्ये १६ उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, १७ सरचिटणीस, २० चिटणीस, १३ सल्लागार, ६ सदस्य त्याचबरोबर १२ कायम निमंत्रीत यांची यादी त्यांनी जाहीर केली. त्यामध्ये अशोक जाधव, यशवंत बाणे, सुधीर दाभोळकर, रमेश शहा, डॉ. विलास शेळके, बरकत काझी, रमाकांत बेलवलकर, रतन पवार, सुरेश राऊत, चंद्रकांत परवडी, मेहमूद पालेकर, अनंत जाधव, जयवंत दूधवडकर, इकबाल घारे, बिपीन गुप्ता, दिगंबर कीर आदींची उपाध्यक्ष म्हणून निवड केल्याचे त्यांनी जाहीर केले. तर, चिटणीस म्हणून माजी शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांची निवड झाल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस भवनला टाळे ठोकल्याच्या प्रकारावरून प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी जिल्हाध्यक्षांना लक्ष केले होते. तसेच शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांना पदावरून दूर केल्याच्या निर्णयाचा समाचार घेताना व्हॉट्सअॅपवर पक्ष चालत नाही, असा सल्ला त्यांनी दिला होता. याबाबत बोलताना अॅड. भोसले म्हणाले की, व्हॉट्सअॅप हे अधिकृत माध्यम असून कायद्यानेदेखील ते अधिकृत मानले आहे. एखाद्याला शिस्त लावायला गेलो तर त्यांना ती मनमानी वाटते. आमदार हुस्नबानू खलिफे यांनादेखील अशाचप्रकारे चावी अभावी परत जावे लागले होते, याची आठवणदेखील त्यांनी करून दिली.

हेही वाचा-मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

ABOUT THE AUTHOR

...view details