महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत आणखी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 145 वर - ratnagiri corona update today

रत्नागिरीमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145 वर पोहोचल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.

Ratnagiri corona update
रत्नागिरी कोरोना अपडेट

By

Published : May 24, 2020, 3:14 PM IST

रत्नागिरी- जिल्हा प्रशासनाकडे आणखी 13 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 145 वर पोहचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी, रात्री मिरजवरून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 13 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. मात्र, मुंबईतून जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचे अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत. आता सध्या पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये बहुसंख्य रुग्ण हे मुंबईतून आलेले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात जवळपास 62691 जण संस्थात्मक आणि होम क्वारंटाइन आहेत. त्यामुळे यापुढेही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे

ABOUT THE AUTHOR

...view details