रत्नागिरी - ग्रामीण पोलिसांनी गुहागर तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये बारा लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला असून दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; बारा लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, 10 जण अटकेत - रत्नागिरी गुन्हे
गुहागर तालुक्यातील पालपेणे, कुंभारवाडी येथे काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार ग्रामीण पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये बारा लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त केला असून दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यातील पालपेणे, कुंभारवाडी येथे काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे चिपळूणचे पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव यांनी शुक्रवारी मध्यरात्री या ठिकाणी छापा टाकला. यावेळी 10 जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून 34 हजार 530 रुपये रोख रक्कम,१० लाखांची इनोव्हा गाडी, 2 लाखांची चारचाकी महिंद्रा मॅक्सिमो तसेच 19 हजार 500 रुपये किंमतीचे 9 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. संबंधित कारवाईत एकूण 12 लाख 54 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नितीन पडवेकर, निशिकांत पडवेकर, नथुराम पडवेकर, प्रवीण मांडवकर, अभिमन्यू वेळ्ळाल, इम्तियाज धामणस्कर, विठ्ठल मांडवकर, दीपक पालकर, संजय टेरवकर व विनोद मांडके अशा दहा जणांना अटक करण्यात आली असून, या सर्वांना शनिवारी संध्याकाळी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेमुळे गुहागर तालुक्यातील जुगार अड्ड्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे.