महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य नाट्य स्पर्धेला आजपासून सुरुवात, कोकण विभागात11 नाटकांची चुरस

रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 18 ते 29 नोव्हेंबरपर्यंत राज्य नाट्यस्पर्धेला सुरुवात होत आहे. या 59 व्या राज्य नाट्यस्पर्धेत कोकण विभागातील 11 नाटकांची चुरस रत्नागिरीत पाहायला मिळणार आहे.

राज्य नाट्यस्पर्धेला सुरुवात

By

Published : Nov 18, 2019, 1:54 PM IST

रत्नागिरी - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या 59 व्या राज्य नाट्य स्पर्धेत कोकण विभागातील 11 नाटकांची चुरस रत्नागिरीत पाहायला मिळणार आहे.

राज्य नाट्यस्पर्धेला सुरुवात

रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात राज्य नाट्यस्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेच्या शुभारंभाचा मान श्री देव भैरीदेव देवस्थान रत्नागिरी यांच्या 'अचानक' या नाटकाला मिळाला आहे. त्यामुळे 18 ते 29 नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरीतील नाट्य रसिकांना आता नाटकांची जणू मेजवाणीच मिळणार आहे. कलावंताना व्यासपीठ मिळावे यासाठी ही स्पर्धा शासनातर्फे घेण्यात येते. यात नाट्य कलाकारांबरोबरच नाट्य रसिकांचा देखील याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details