रत्नागिरी- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त रत्नागिरीत आज (शनिवारी)1 लाख सूर्यनमस्कार घालण्यात आले. यामध्ये 6 हजार विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक-कर्मचारी अशा 7 हजार जणांनी सहभाग घेतला होता.
जागतिक सूर्यनमस्कार दिन : रत्नागिरीत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घातले 1 लाख सूर्यनमस्कार - Ratnagiri latest news
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने 1 लाख सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन केले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानात हे सूर्यनमस्कार घालण्यात आले.
जागतिक सूर्यनमस्कार दिन
हेही वाचा - खेडमधील तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप, जिल्हाधिकार्यांनी साधला संपर्क
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानात हे सूर्यनमस्कार घातले गेले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमधील विद्यार्थी, तसेच इतरही काही शाळांमधील विद्यार्थी सूर्यनमस्कार घालण्यासाठी सकाळपासूनच मैदानात हजर होते. गेली 4 वर्षे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.