रायगड -सेवापट आणि शेवटचे पगार पावती बदली झालेल्या ठिकाणी जोडण्यासाठी मागितलेल्या दहा हजारांच्या लाचेप्रकरणी पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांना अलिबाग लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. अलिबाग जिल्हा परिषद कार्यालयातून साबळे यांना लाचलुचपत पथकाने अटक केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदमधील शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
दहा हजारांची केली होती मागणी -
फिर्यादी शिक्षक यांची पनवेल येथून यवतमाळ येथे बदली झाली होती. यवतमाळ येथे बदली झालेल्या ठिकाणी जाऊन आपला पगार निघावा, यासाठी सेवापट आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे रुजू असतानाची शेवटची पगार पावती मिळावी, यासाठी फिर्यादी यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांच्याकडे मागणी केली होती. नवनाथ साबळे यांनी फिर्यादी याच्याकडे सेवापट आणि पगार पावतीसाठी आधी पन्नास हजारांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर दहा हजारांची तोड झाली.
जिल्हा परिषद कार्यालयातून केली अटक -