खालापूर/रायगड-तुराडे येथील मयुर मोरेश्वर महाडिक (वय 24 ) या तरुणाचा मंगळवार दिनांक 6 रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे पकडताना पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
पाय घसरल्याने रेल्वे खाली गेला मयुर-
याबाबत माहिती अशी की, रसायनी रेल्वे स्टेशन अप लाईनवर स्टोन क्रमांक ७९/२१/२३ च्या जवळ रोहा - पनवेल वर्कं मॅन स्पेशल ही चालू ट्रेन पकडताना मयुरचा पाय घसरून रेल्वेखाली गेला. यात रेल्वे अंगावरुन गेल्याने त्यामध्ये गंभीर दूखापत होऊन शरीराचे कमरेतून दोन तुकडे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.