मुंबई:अलिबाग सत्र न्यायालयाने (Sessions Court at Alibag) मे 1990 मध्ये मनोहर ओवळेकर याला तसेच त्याच्या वडलाला कुटुंबातील लग्नासाठी आलेल्या एका व्यक्तीवर भाल्याने वार केल्याच्या आरोपात दोषी ठरवले होते, तर कथित जमावाचा भाग असलेल्या इतर 9 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. सत्र न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्णयाविरोधात आरोपी मनोहरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु अपील प्रलंबित राहिले यातच 2018 मध्ये मनोहरच्या वडिलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मनोहरला निर्दोष मुक्त करण्याचे (Innocent after 24 years) निर्देश दिले.
Innocent after 24 years : जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या तरुणाची 24 वर्षाने निर्दोष मुक्तता - जन्मठेपेची शिक्षा
अलिबाग येथील सत्र न्यायालयाने (Sessions Court at Alibag) जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या तरुणाला 24 वर्षानंतर निर्दोष (Innocent after 24 years) मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. 1998 मध्ये सत्र न्यायालयाने तो तरुण आणि त्याच्या वडीलांना जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावली होती. मनोहर ओवळेकर हा 28 वर्षांचा होता तेव्हा त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते.
न्यायमूर्ती साधना जाधव आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना निरीक्षण नोंदवले की, वैद्यकीय पुराव्या नुसार पीडितेचा मृत्यू वडिलांनी केलेल्या भाल्याच्या हल्ल्यामुळे झाला आहे, आणि पुराव्याशिवाय आरोपी मुलावर समान हेतू सांगणे हे अत्यंत चुकीचे आहे. याचिकाकर्त्या विरोधात लावलेल्या कलम 302 च्या आरोपाला सिद्ध करण्यात तक्रार कर्ते पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. फिर्यादीने जोडलेले पुरावे सुसंगत किंवा ठोस नाहीत आणि म्हणून ते विश्वसनीय नाहीत. त्यामुळे अपीलकर्त्याला संशयाचा फायदा मिळण्याचा हक्क आहे असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.