महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बस -सायकलच्या अपघातात तरुणाचा मृत्यू - रायगड जिल्हा बातमी

बसच्या चाकाखाली येऊन तरुण जागीच ठार झाला आहे. अलिबाग शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात हा अपघात झाला. मृत तरुणाचे अंदाजे वय 35 च्या आसपास आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील होता. अपघातानंतर मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Raigad accident news
बस -सायकलच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

By

Published : Nov 2, 2020, 5:34 PM IST

रायगड -बसच्या चाकाखाली येऊन तरुण जागीच ठार झाला आहे. अलिबाग शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात हा अपघात झाला. मृत तरुणाचे अंदाजे वय 35 च्या आसपास आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील होता. अपघातानंतर मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बस -सायकलच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

अलिबाग शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात, सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मृत तरुण हा अलिबागकडे सायकलवर येत होता. यावेळी आंबेडकर चौकात बसने त्याच्या सायकलला मागून धडक दिली. या अपघातात तरुण बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना कळताच अलिबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गर्दीच्या ठिकाणी अपघात झाल्याने काही काळ येथील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी संबंधित बस जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details