महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खोपोलीत तरुणाची आत्महत्या - रायगड जिल्हा लेटेस्ट न्यूज

रिक्षाचालक तरुणाने रेल्वेखाली झोपून आत्महत्या केल्याची घटना खोपोली शहरात घडली आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कर्जत मुंबई रेल्वे रुळावर झोपून या तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

खोपोलीत तरुणाची आत्महत्या
खोपोलीत तरुणाची आत्महत्या

By

Published : Apr 24, 2021, 8:23 PM IST

रायगड -रिक्षाचालक तरुणाने रेल्वेखाली झोपून आत्महत्या केल्याची घटना खोपोली शहरात घडली आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कर्जत मुंबई रेल्वे रुळावर झोपून या तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जफर फारूक शेख वय 26 रा. मुकुंद नगर असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने खोपोली रेल्वे स्थानकातून कर्जतकडे जाण्यासाठी निघालेल्या रेल्वेखाली झोपून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह खोपोवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचा -...तर महाविकास आघाडी सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल - राजू शेट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details