महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भर उन्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना पीर योगी भाईनाथ महाराजांकडून खाऊचे वाटप - महंत योगी भाईनाथ महाराज खोपोली

कोरोना काळात पोलीस अधिकारी व कर्मचारी भर उन्हाच्या कडाक्यात रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे खोपोली येथे महंत मठाधिपती श्री साईनाथ दरबारचे पीर योगी मठाधिश श्री.श्री.श्री 1008 महंत योगी भाईनाथ महाराज यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. तसेच पोलिसांना मास्क, सॅनिटायझर आणि खाऊचे वाटप केले.

khopoli
खोपोली

By

Published : May 10, 2021, 4:48 PM IST

रायगड - कोरोना साखळी तोडण्यासाठी सरकारच्या वतीने लॉकडाऊन सुरू केला आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी भर उन्हाच्या कडाक्यात रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खोपोलीतील महंत मठाधिपती श्री साईनाथ दरबारचे पीर योगी मठाधिश श्री.श्री.श्री 1008 महंत योगी भाईनाथ महाराज स्वतः पुढे सरसावले आहेत. त्यांनी पोलिसांना मास्क, सॅनिटायझर, पाणी, बिस्किटे आणि फ्रुटी देऊन कौतुक केले आहे.

'कोरोना काळात मोठ्या जोखमीने पोलीस अधिकारी व कर्मचारी आपली दिवस - रात्र सेवा करीत असतात. कधीकधी त्यांना जेवण व नाश्ता करण्याचे लक्षात राहत नाही. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समाजाप्रती ऋण आणि आभार मानण्यासाठी त्यांना सॅनिटायझर, मास्क आणि खाऊचे वाटप करण्यात आले. सर्वांनी कोरोना काळात स्वतः बरोबर कुटुंबाचीही काळजी घ्या', असे भाईनाथ महाराज यांनी म्हटले आहे.

यावर्षीही कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. ती पोलीस अधिकारी व कर्मचारी सक्षम पार पाडत आहेत. त्यांचे कौतुक करण्यासाठी महंत मठाधिपती श्री.साईनाथ दरबारचे पीर योगी श्री.श्री.श्री 1008 महंत योगी भाईनाथ महाराज यांनी खालापूर टोल नाका, दस्तुरी पोलिस चौकी, पाली फाटा, शिळफाटा, खोपोली गावातील पोलीस चौकी अशा विविध ठिकाणी भर उन्हातान्हात उभे असणाऱ्या पोलिसांना मास्क, सॅनिटाझर, पाणी, बिस्किटे आणि फ्रुटीचे वाटप केले. तसेच पोलिसांच्या या कामाचे कौतुकही केली.

हेही वाचा -लग्नातील फोटो देण्याच्या बहाण्याने केली मैत्री, ठेवले शारीरिक संबंध, पोलिस तक्रार दाखल

हेही वाचा -इथे कोरोनाला कोणीच घाबरत नाही? मालेगावकरांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन

ABOUT THE AUTHOR

...view details