रायगड- खालापूर तालुका हद्दीत असलेल्या केळवली वांगणी येथील रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळावरील दरड काढली असून रेल्वे सेवा सुरू झाल्याची माहिती मध्ये रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरड कोसळल्याने पुण्याकडे जाणारी व मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे पॅसेंजर गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या होत्या.
केळवली वांगणी रेल्वे रुळावर दरड कोसळली; दीड तासानंतर वाहतूक सुरळीत
खालापूर तालुक्यातील केळवली वांगणी या ठिकाणी साडेचार वाजण्याच्या सुमारास डोंगरावरील दरडीचा काही भाग कोसळून रेल्वे रुळावर पडला होता. त्यामुळे चेन्नई एक्स्प्रेस कर्जतला तर कोणार्क वांगणीला थांबवण्यात आली होती. नागकोईल पळसदरी आऊटरला व सिंहगड भिवपुरी आऊटरला थांबवण्यात आली होती.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन रेल्वे रुळावर पडलेली दरड त्वरित बाजूला केली. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र, दरड कोसळल्यामुळे दीड ते दोन तास प्रवाशांचा खोळंबा झाला होता.