पनवेल- पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर पालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ पालिकेच्या सेवेत कायम घ्यावेत, या मागणीसाठी पनवेल पालिकेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत पनवेल पालिकेकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे सलग चौथ्या दिवशीही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हे धरणे आंदोलन सुरू आहे.
2016 साली पनवेल महापालिका नव्याने स्थापन झाली. त्यावेळी जवळपास 29 गावांतील 23 ग्रामपंचातींचा समावेश महानगरपालिकेत करण्यात आला. पालिकेत समावेश करताना तत्कालीन ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या 384 कर्मचाऱ्यांना पालिकेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पनवेल महापालिका स्थापन होऊन 30 वर्षे उलटून गेली तरीही हा प्रश्न प्रलंबित असल्याने अखेर म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या 384 कर्मचाऱ्यांनी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाशेजारीच धरणे आंदोलन पुकारले आहे. जुलै, 2019 मध्ये तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत कायम करण्याबाबत नगरविकास विभागाला निर्देश दिले होते. परंतु अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे कर्मचाऱ्यांचे समावेशन रखडल्याचा आरोप यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - जागतिक मराठी अकादमी संमेलन: पाहा चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम