रायगड (अलिबाग) -अलिबाग येथे महिला किसान दिनानिमित्त कृषी मूल्यवर्धन आणि विपणन साखळी व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांचे जिल्ह्यातील इतर महिलांना मार्गदर्शन होण्यासाठी जिल्हास्तरीय महिला किसान मेळावा आयोजित करण्यात आला होता.
महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन -
कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित महिला शेतकऱ्यांना कृषी, मत्स्यव्यवसाय, महिला आर्थिक विकास महामंडळ या विभागाकडील विविध योजनांबद्दल तसेच आंबा, काजू, कोकम, औषधी वनस्पती, भात, नाचणी, दूध, मासे इत्यादी प्रक्रिया उद्योगांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार
मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले तसेच कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला, उपस्थित शेतकरी महिलांना शेती बियाणांचे वाटपही करण्यात आले. या मेळाव्यास महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.