महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळ परिस्थितीत राज्याला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणार - निधी चौधरी

राज्यात ऑक्सिजन वितरण करण्यात जिल्हा सक्रिय असल्याने वादळसदृश्य परिस्थितीतही राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली गेली आहे.

Nidhi Chaudhary
निधी चौधरी

By

Published : May 15, 2021, 7:49 PM IST

Updated : May 15, 2021, 10:02 PM IST

रायगड - 16 आणि 17 मे रोजी रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. राज्यात ऑक्सिजन वितरण करण्यात जिल्हा सक्रिय असल्याने वादळसदृश्य परिस्थितीतही राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली गेली आहे. 48 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा जिल्ह्यात उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. वादळामुळे अतिवृष्टी आणि वारे वाहून वीज जाण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील आयसीयू कोविडं सेंटरमध्ये दोन जनरेटर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात ऑक्सिजन वितरण करण्यास कोणती अडचण येऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम,नॅशनल हायवे विभाग यांनाही सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी निधी चौधरी

वादळाचा फटका जिल्ह्याला बसणार

तौक्ते चक्रीवादळ हे हळूहळू रायगडाकडे सरकू लागले आहे. निसर्ग चक्रीवादळ प्रमाणे जिल्ह्याच्या समुद्रकिनारी वादळ धडकणार नसले तरी त्याचा फटका हा पडणार आहे. यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क केले आहे. मुसळधार पाऊस आणि वारे वाहून झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील निकामी झालेली झाडे कापण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

हेही वाचा -कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपण निष्काळजीपणाने वागलो म्हणून हे संकट उभं राहिलं - मोहन भागवत

वादळ सदृश्य परिस्थितीत राज्यात ऑक्सिजन पुरवठा करणार

16 ते 17 मे रोजी तौक्ते चक्रीवादळ रायगडच्या समुद्रातून जाणार असल्याने याचा फटका हा काही भागात बसणार आहे. कोरोनाचे संकटही असल्याने आणि वादळाची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचे पावले उचलली आहेत. वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तरी कोरोना रुग्णांना आणि राज्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या कंपनी मध्ये वादळात वीज गेल्याने अडचण होऊ नये यासाठी महावितरण यंत्रणा सक्रिय केली आहे. तसेच वादळ, अतिवृष्टी मुळे झाडे उन्मळून पडून रस्ते बंद होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम, नॅशनल हायवे यंत्रणेला कटर, जेसीबी,क्रेन सह तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात ऑक्सिजम पुरवठा करण्यास अडचण निर्माण होणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 48 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा ठेवला आहे उपलब्ध

एकीकडे वादळाची शक्यता तर दुसरीकडे कोरोनाचे संकट अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन खंबीरपणे परिस्थिती हाताळत आहे. 48 तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. तसेच आयसीयू कोव्हिडं सेंटरमध्ये वादळ काळात वीज गेल्यास दोन जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. जेणेकरून कोरोना रुग्णांना कोणतीही अडचण येणार नाही. असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागरिकांनी वादळ, अतिवृष्टी काळात बाहेर पडू नका

तौक्ते चक्रीवादळ जिल्ह्यात समुद्रात सरकत असताना त्याचा काही प्रमाणात फटका हा रायगडला बसणार आहे. याकाळात मुसळधार पाऊस आणि 40 ते 60 ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील झाडे, विजेचे खांब पडण्याची शक्यता आहे. अशा या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये. दोन दिवस पुरेल इतका अन्नधान्यचा साठा करून घरातच रहा असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा -देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचे धाडस करावे - नाना पटोले

Last Updated : May 15, 2021, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details