रायगड -शहरातील राधिका लॉज परिसरात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाडमध्ये शस्त्रसाठा जप्त, एकास अटक
महाड पोलिसांकडून रात्रीच्या वेळी कॉम्बिग ऑपरेशन करण्यात येत होते. यावेळी राधिका लॉज येथे आरोपी बावनसिंग हा संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये ५१० धारदार शस्त्र आढळून आली.
बावन सिंग सोनूसिंग असे आरोपीचे नाव आहे. महाड पोलिसांकडून रात्रीच्या वेळी कॉम्बिग ऑपरेशन करण्यात येत होते. यावेळी राधिका लॉज येथे आरोपी बावनसिंग हा संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये ५१० धारदार शस्त्र आढळून आली. याची किंमत जवळपास २० हजार रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नाका, लॉजची तपासणी सुरू आहे. हा आरोपी एवढा शस्त्रसाठा घेऊन महाडमध्ये कशासाठी आला होता? याबाबत महाड शहर पोलीस तपास करीत आहेत.