महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेणमधील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदी किनारच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा - रायगड जिल्ह्यात पाऊस

पेण तालुक्यातील हेटवणे धरण 90 टक्के भरले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आगामी 4 दिवस अतिवृष्टी होणार असल्याने दक्षता बाळगत हेटवणे धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी उघडले आहेत. हेटवणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 146 दशलक्ष घनमीटर आहे.

पेण मधील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदी किनारच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
पेण मधील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदी किनारच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

By

Published : Aug 21, 2020, 6:56 PM IST

रायगड - पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून वाशीसह नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या हेटवणे धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी शुक्रवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान उघडण्यात आले आहेत. धरणाचे दरवाजे उघडले असले तरी धरण काठच्या तसेच नदीकिनारी असलेल्या गावांना कोणताही धोका नसला तरी सतर्क राहण्याचा इशारा पेण प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात आठवड्यापासून सतत होणाऱ्या पावसामुळे पेण तालुक्यातील हेटवणे धरण 90 टक्के भरले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आगामी 4 दिवस अतिवृष्टी होणार असल्याने दक्षता बाळगत हेटवणे धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी उघडले आहेत. हेटवणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 146 दशलक्ष घनमीटर आहे. या धरणाला 6 दरवाजे असून या दरवाजाची उंची 3 मीटर आहे. सदरचे दरवाजे तूर्त 2 फुटांनी उघडले आहेत. या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद प्रति सेकंद 50 हजार लिटर प्रमाणे प्रती तास 18 कोटी लिटर प्रमाणे होत आहे. त्यामुळे भोगावती नदी किनाराबव खाडीकिनार्यावरील ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.

घाबरू नका काळजी घ्या

नदी व खाडी किनारील नागरिकांनी घाबरू नये. कारण या विसर्गामुळे कोणत्याही प्रकारची पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. परंतु नागरिकांनी काळजी मात्र घेणे गरजेचे आहे. नदी व खाडी मध्ये विनाकारण पोहण्याकरिता तसेच मच्छिमारी करिता जाऊ नये. त्याचप्रमाणे अतिउत्साहाने सेल्फी काढण्याकरिता सुद्धा नदी व खाडी किनारी जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. जाधव व उपअभियंता आकाश ठोंबरे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details